मोठी बातमी : कॉंग्रेस नेते वडेट्टीवार यांना आयकर विभागाची नोटीस !
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाआधी ही नोटीस मिळाल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. लोकांसाठी उठवलेला आवाज दाबण्यासाठी सरकार त्यांच्या एजन्सींचा गैरवापर करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. गडचिरोली येथे…