November 6, 2026 9:40 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » चोरट्यांनी घेतला गर्दीचा फायदा : महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची सोन्याची पोत लंपास !

चोरट्यांनी घेतला गर्दीचा फायदा : महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची सोन्याची पोत लंपास !

चाळीसगाव : प्रतिनिधी

दिवाळीच्या सुट्टीनंतर बसस्थानकावर वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पुन्हा आपले हातसाफ केले आहेत. कन्नड येथील एका महिलेच्या गळ्यातील तब्बल ९० हजारांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चाळीसगाव बसस्थानकावर घडली.

सविस्तर वृत्त असे कि, कन्नड येथील मीराबाई रमेश सूर्यवंशी (वय ५०) या आपल्या कुटुंबीयांसह सुनेच्या वैद्यकीय तपासणीसाठी चाळीसगाव येथे आल्या होत्या. त्यांनी लहान मुलगा व सुनेला रुग्णालयात पाठवले. तर मोठा मुलगा, सुन व नातू यांची धुळ्याकडून येणाऱ्या बसची त्या वाट पाहत होत्या. मीराबाई व त्यांचे पती हे नातवाला खाऊ देण्यासाठी चाळीसगाव बसस्थानकात आले होते. दरम्यान, २६ रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते धुळे बसच्या खिडकीतून नातवाला खाऊ देत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅमची ९० हजारलाची सोन्याची पोत चोरून नेली. या घटनेनंतर मीराबाईंनी कुटुंबासह पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले; मात्र, चोरीचा ठोस पुरावा हाती लागला नाही. दरम्यान, दिवाळीनंतर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असल्याने चोरटे सक्रीय झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!