अखेर दोन सराईत चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील रावेर पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने सोनसाखळी जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत दोन सराईत चोरांना अटक केली आहे. संशयितांच्या ताब्यातून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी आहेत. रावेर येथे दाखल गुन्हा क्रमांक ४७४/२०२५ (कलम ३०४(२)) मध्ये शोभाबाई सुरेश…