November 15, 2026 12:42 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » महाराष्ट्र » परळीत रात्री स्ट्राँग रूमबाहेर ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा : पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज !

परळीत रात्री स्ट्राँग रूमबाहेर ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा : पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज !

बीड : वृत्तसंस्था 

राज्यभरात नगर परिषद निवडणुकीचे मतदान मंगळवारी पार पडले. निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालाच्या आधीच स्ट्राँग रूमच्या सुरक्षेवरून वातावरण चांगलेच तापले आहे. बीडच्या परळीमध्ये बुधवारी रात्री नगर परिषदेत स्ट्राँग रूमची पाहणी करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक देशमुख आणि उपस्थित कर्मचारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आणि वाढत्या तणावामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामुळे नगर परिषद समोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक देशमुख हे बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नगर परिषदेतील स्ट्राँग रूमच्या पाहणीसाठी गेले होते. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप देशमुख यांनी केला. या घटनेची माहिती मिळताच देशमुख समर्थक मोठ्या संख्येने नगरपरिषदेबाहेर जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ज्या कर्मचाऱ्याने शिवीगाळ केली, त्याची वैद्यकीय तपासणी (मेडिकल) करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी लावून धरली. तसेच त्यांनी या घटनेची माहिती फोनवरून खासदार बजरंग सोनवणे यांनाही दिली.

तणाव वाढल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. मात्र, नगर परिषदेच्या गेटबाहेर जमाव आक्रमक झाल्याने आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. या गोंधळामुळे सुमारे दोन तास नगर परिषद परिसरात तणावाचे वातावरण होते. सध्या तिथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी सकाळी नगरपरिषद इमारतीत असलेल्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीनमध्ये ठेवण्यात आल्या. त्यावेळी दीपक देशमुख यांनी स्ट्राँग रूमवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांवर अविश्वास व्यक्त करत स्ट्राँग रूमबाहेर थांबण्याची परवानगी मागितली होती. प्रशासनाने उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी पार्किंगमध्ये स्क्रीनची व्यवस्था केली आहे, तरीही रात्री हा राडा झालाच.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!