महायुतीची दमदार सुरुवात; मनोज चौधरी बिनविरोध
जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दमदार सुरुवात करत बिनविरोध विजयांची मालिका सुरू ठेवली आहे. डॉ. गौरव सोनवणे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांचीही बिनविरोध निवड झाली असून, त्यामुळे शिवसेनेचा दुसरा तर महायुतीचा तिसरा उमेदवार मतदानाआधीच विजयी ठरला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली…