‘मराठी माणसाला दुय्यम समजू नका’; गुलाबराव पाटलांच्या विधानावर मनसेचा संताप !
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर बिहारी तरुणांचे कौतुक करत मराठी तरुणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मराठी तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही, या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्रमक भूमिका घेतली असून, मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी गुलाबराव पाटील यांना खडेबोल सुनावले…