जळगाव : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून आजाराशी झुंज देणाऱ्या एका ३४ वर्षीय तरुणाने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. गणेश समाधान अहिरे (वय ३४, रा. जुने जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गणेश अहिरे हा आपल्या आईसोबत जुने जळगाव भागात राहत होता. तो गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी असल्याने शारीरिक आणि मानसिक त्रासात होता. शुक्रवारी दि २३ रोजी त्याची आई काही कामासाठी घराबाहेर गेली होती. घरात कुणीही नसताना गणेशने टोकाचे पाऊल उचलले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

आई जेव्हा बाहेरून घरी परतली, तेव्हा तिला मुलगा बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. हा प्रकार पाहून त्यांनी हंबरडा फोडला. तात्काळ परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि गणेशला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला ‘मृत’ घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



