टीव्हीची केबल काढली, मोबाईल फ्लाइट मोडवर; अजित पवारांच्या आईला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न
बारामती : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आता अजित पवारांच्या बारामतीतील फार्महाऊसवरून समोर आलेली माहिती मनाला चटका लावणारी ठरत आहे. फार्महाऊसवरील व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी अजित पवारांच्या आईंशी संबंधित हृदयद्रावक प्रसंग उघड केला आहे. संपत…