November 8, 2026 9:21 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » एरंडोलमध्ये तलाठ्यांचा लाचखोर चेहरा उघड : ३० हजार घेताना दोन तलाठी एसीबीच्या जाळ्यात

एरंडोलमध्ये तलाठ्यांचा लाचखोर चेहरा उघड : ३० हजार घेताना दोन तलाठी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उघडकीस आणला आहे. नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने राबविलेल्या सापळा कारवाईत दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८/२०२६ दाखल करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नरेश भास्कर शिरूड (वय ४१), तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६), तलाठी सजा उत्राण गुजर हद्द, ता. एरंडोल अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदाराचा ट्रॅक्टर २७ जानेवारी २०२६ रोजी गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला होता. पुढील कारवाई टाळण्यासाठी व ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी सुरुवातीला आरोपींनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र पडताळणीदरम्यान ही मागणी वाढवून ३० हजार करण्यात आली. “इतरांकडून जास्त घेतो, तू गरीब आहेस म्हणून तुझ्याकडून ३० हजार घेतो,” असे म्हणत लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष मागणी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत सापळा कारवाई राबविण्यात आली. या ठिकाणी आरोपी शिवाजी घोलप यांनी नरेश शिरूड यांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने दोघांना रंगेहात पकडले. सापळा कारवाईदरम्यान आरोपी नरेश शिरूड यांच्या ताब्यातून १ लाख ७३ हजार ३०० रुपये रोख, सुमारे २ हजार ९५० रुपये किमतीची Paul John कंपनीची ७५० मि.ली. व्हिस्की बाटली व ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई 

या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस अंमलदार प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी व सचिन चाटे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत असून वरिष्ठ मार्गदर्शन पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांचे लाभले.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!