दुचाकी चोरट्यांना पोलिसांचा ‘ब्रेक’; दोन आरोपी पोलीस कोठडीत
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गर्दीच्या ठिकाणांवरून दुचाकी चोरी करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. काशिनाथ चौकातून चोरीला गेलेली हिरो होंडा सुपर स्प्लेंडर दुचाकी हस्तगत करत पोलिसांनी दोन अट्टल चोरांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फिर्यादी शालिक पाटील (रा. धानोरा खु.,…