November 4, 2026 11:20 pm

लाईव्ह न्यूज :
जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल जळगावच्या तीन पैलवानांची आंतरराष्ट्रीय भरारी! राजू मामा भोळे यांच्या सहकार्याने आशियाई चॅम्पियनशिपची संधी
लाईव्ह न्यूज :
जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल जळगावच्या तीन पैलवानांची आंतरराष्ट्रीय भरारी! राजू मामा भोळे यांच्या सहकार्याने आशियाई चॅम्पियनशिपची संधी
Home » जळगाव » जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड!

जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड!

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्या लाच प्रकरणात मोठी मालमत्ता उघडकीस आली आहे. १० हजार रुपयांच्या लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या शिसोदे यांच्या घराची आणि जळगाव जनता सहकारी बँकेतील लॉकरची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली. या तपासणीत तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये किमतीची मालमत्ता आढळून आली आहे. यामध्ये सोन्याचे बिस्कीट, सोन्या–चांदीचे दागिने, प्लॅटिनम, लाखोंची रोकड आणि दोन घरांचा समावेश आहे.

 

सतीश शिसोदे हे जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागात वर्ग एकचे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत. २ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध लाचेच्या प्रकरणात सापळा कारवाई केली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५१/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईनंतर एसीबी पथकाने शिसोदे यांच्या आदर्श नगर परिसरातील स्वामी विवेकानंद सोसायटी येथील राहत्या घराची तसेच जळगाव जनता सहकारी बँकेतील लॉकरची झडती घेतली. या झडतीत कोट्यवधींची मालमत्ता समोर आली.

 

सोन्याचे बिस्कीट अन् अडीच किलोहून अधिक सोने

 

झडतीदरम्यान ३ कोटी ५१ लाख ८१ हजार १५३ रुपये किमतीचे तब्बल २ हजार ५२४.१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळले. यामध्ये सोन्याची बिस्किटे, सोन्याच्या पट्ट्या, चेन, पेंडंट, लॉकेट, बांगड्या आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे.

 

याशिवाय १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये किमतीचे ११ हजार ६३३.७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि वस्तू मिळून आल्या. यात चांदीची लगड, बिस्किटे, वाट्या, ताटे आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. तसेच ३ लाख ५५ हजार २८६ रुपये किमतीचे १०१.०२ ग्रॅम वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही आढळून आले.

 

घरात रोकड, आदर्श नगरमध्ये दोन घरे

 

घरझडतीदरम्यान ७ लाख ९७ हजार ९२० रुपये रोख रक्कम आढळली. शिसोदे यांच्या नावाशी संबंधित आदर्श नगर परिसरातील दोन घरांची किंमत अनुक्रमे ४५ लाख आणि ६५ लाख रुपये अशी नोंदविण्यात आली आहे. या दोन्ही घरांची एकूण किंमत १ कोटी १० लाख रुपये आहे. याशिवाय घरातील मौल्यवान वस्तूंची अंदाजित किंमत २४ लाख ३९ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

घरझडतीत आढळलेल्या रोकड, दोन घरे आणि घरातील वस्तूंची एकत्रित किंमत १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपये असल्याचे एसीबीच्या माहितीत नमूद आहे.

बँक लॉकरमध्ये ३.७४ कोटींचा ऐवज

 

जळगाव जनता सहकारी बँकेतील लॉकरच्या तपासणीत सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू मिळून आल्या. लॉकरमधील या वस्तूंची एकूण किंमत ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

घरातील मालमत्ता आणि बँक लॉकरमधील ऐवज अशा दोन्हींची एकत्रित किंमत ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये आहे. लाचेच्या प्रकरणातील तपासादरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता आढळल्याने तिच्या स्रोताबाबत तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे.

 

५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

 

या प्रकरणात अटक करण्यात आलेले सतीश शिसोदे सध्या ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. आढळलेल्या मालमत्तेचे स्रोत, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित बाबींचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

 

एसीबीच्या दोन पथकांचा सहभाग

 

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. बँक लॉकरच्या झडती पथकात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, हेड कॉन्स्टेबल किशोर महाजन, महिला हेड कॉन्स्टेबल संगीता पवार, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि सचिन चाटे यांचा सहभाग होता.

 

तर घरझडती पथकात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हेड कॉन्स्टेबल सुनील वानखेडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज महाजन यांनी सहभाग घेतला.

लाचेच्या प्रकरणातून सुरू झालेल्या तपासात सतीश शिसोदे यांच्याशी संबंधित ५ कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता समोर आल्याने जळगाव जिल्ह्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!