शहरात काढली तिरडीतील प्रतिकात्मक अंत्ययात्रा; शिवरायांचा अपमान सहन न होणार, भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

जळगाव : प्रतिनिधी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाने रविवारी जळगाव शहरात तीव्र आंदोलन छेडले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता भारतीय जनता पक्षाच्या जुने वसंत स्मृती कार्यालयापासून या […]
तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली : रुग्णालयात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि प्रसिद्ध वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांची बुधवारी प्रकृती अचानक बिघडल्याने मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक उपचार आणि तपासण्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सध्या ते स्थिर आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेजस यांची काही आवश्यक […]
जळगावात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; तीन घरे खाक !

जळगाव : प्रतिनिधी जुन्या जळगाव भागातील तरुण कुढापा चौक परिसरात रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरून गेला. या भीषण आगीत निलेश शंकर शिरसाट व बापू शंकर शिरसाट यांच्या तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार आग सुरू झाली ती शॉर्ट सर्किटमुळे आणि […]
पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये दगडफेक: २ जखमी

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे पडसाद आज पुण्याच्या रस्त्यावर उमटताना दिसत आहेत. या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपने पुणे काँग्रेस भवनावर धडक दिली. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने जोरदार घोषणाबाजी, दगडफेक आणि बाटल्यांची फेक झाली. या संघर्षात काही काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले आहे. […]
जळगावमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; भाजीपाल्याच्या दुकानाचे नुकसान

जळगाव : प्रतिनिधी जळगाव येथील महाबळ स्टॉप जवळील साई प्लाझा कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत भाजीपाल्याचे दुकान रौद्ररूप धारण करून काही क्षणांतच उद्ध्वस्त झाले. मिळालेल्या माहितीनुसार, भाजीपाला दुकानासोबतच शेजारी साई भूषण बेकरी आहे. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठवण्यात आले. अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने […]
दिल्लीतील तरुणाच्या नावावर जळगावात बनावट अॅडमिशन; मेडिक्लेम रक्कम लाटली

जळगाव : प्रतिनिधी पॅथॉलीजी लॅबमधून बनावट रिपोर्ट तयार करुन तो शहरातील टायटन मल्टी स्पेशलीटी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट झाल्याचे दाखविले. त्यानंतर तरुणाच्या नावाने मेडीकल बिलाचा क्लेम कंपनीकडून मंजूर करुन घेत दिल्ली येथील विजय संतराम गुप्ता (वय २५, रा. तुघलकाबाद, नवीन दिल्ली) या तरुणाची जळगावात फसवणूक केली. ही घटना दि. २१ सप्टेंबर २०२४ मध्ये घडली. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या […]
दक्षता पेट्रोलपंपातील कोट्यवधींची रोकड गायब? जबाबदार उपनिरीक्षकच बेपत्ता

जळगाव : प्रतिनिधी जळगाव पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावर पेट्रोल विक्रीतून मिळणारी रोकड सांभाळण्याची जबाबदारी उपनिरीक्षक वाल्मिक मधुकर वाघ (वय ५७, रा. साईनगर, निमखेडी) यांच्याकडे दिली आहे. परंतू गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी ती कोट्यावधी रुपयांची रोकड बँकेत भरलेली नाही. तर आता वाल्मिक वाघ हेच गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाले असून याप्रकरणी तालुका पोलिसात […]
भरवस्तीत धाडसी घरफोडी; गॅस कटरने कपाट फोडून लाखोंचा ऐवज लंपास

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील भरवस्तीत चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने घरफोडी करत रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धाडसी घटना उघडकीस आली आहे. आठ दिवस घर बंद असल्याचा फायदा घेत ही चोरी करण्यात आली. जमीला रऊफ कुरेशी या ६ तारखेला आईची प्रकृती बिघडल्याने बडनेरा येथे गेल्या होत्या. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्या तेथेच थांबल्या होत्या. दरम्यान, […]
तुमच्या योजना तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील. आज तुम्ही काहीतरी मोठे आणि वेगळे करण्याचा विचार करू शकता.

आजचे राशिभविष्य दि.१५ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज काहीतरी खास साध्य केल्याने तुमचे मनोबल वाढेल. आज कोणतीही गुंतवणूक करताना तुमच्या बजेटची काळजी घ्या. या राशीत जन्मलेल्या आणि नोकरी करणाऱ्यांना प्रगती होण्याची शक्यता आहे आणि तुमचे स्थलांतर देखील होऊ शकते. तुमच्या कुटुंबासमोर तुमचे विचार व्यक्त करण्याची तुम्हाला भरपूर संधी मिळेल. आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. […]