September 20, 2026 3:51 pm

मोठी बातमी : ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली दिलगिरी !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कथित तुलना केल्याच्या वादावर अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. “माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता,” असे स्पष्ट करत त्यांनी मनःपूर्वक खेद व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. […]

पत्रकारांच्या सवालांनी सोमय्यांचा पारा चढला

नाशिक : वृत्तसंस्था भाजप नेते किरिट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांच्या कथित बनावट जन्मदाखल्यांच्या मुद्यावरून नाशिक येथे पत्रकारांशी हुज्जत घातल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमय्यांवर सडकून टीका केली आहे. “भाजप नेत्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. ते फक्त स्वतःचे कथानक पुढे रेटण्यात व्यस्त आहेत,” असा आरोप विरोधकांनी केला. सोमय्या यांनी […]

कचरा निर्मूलन वेळेवर, शिस्तबद्ध पद्धतीने करा अन्यथा करणार कारवाई

दुसऱ्या दिवशीही भेटीचा धडाका सुरू, महापौरांनी घंटागाडी केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या व्यथा घेतल्या जाणून ! जळगाव : प्रतिनिधी शहरातील विकास कामांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा एकदा भेटीचा धडाका कायम ठेवला. महापालिकेच्या जुन्या टीबी हॉस्पिटल परिसरातील घंटागाडी केंद्राला त्यांनी अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. […]

अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती निर्णायक ठरणार?

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा परिणाम झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही साधने दीर्घकाळ ज्वाळांमध्ये राहिल्याने त्यांना मोठे नुकसान झाले असून तपास प्रक्रियेस काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र उपलब्ध […]

टिपू सुलतान–शिवाजी महाराज तुलना प्रकरणी वाद तीव्र; गार्गी सपकाळ यांची जोरदार भूमिका

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात सध्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचे सांगितले जात असून, या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांच्यावर तीव्र टीका करण्यात येत आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना सपकाळ यांची मुलगी गार्गी सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या […]

जादा भाड्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, ३२ वाहने जप्त

ठाणे : वृत्तसंस्था जादा मासिक भाड्याचे आमिष दाखवून वाहनमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात ठाणे गुन्हे शाखा घटक-५ ला यश आले आहे. या कारवाईत ३२ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून उलवे, नवी मुंबई येथील ३८ वर्षीय संदीप रघु शेट्टी याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेट्टी हा वाहनमालकांना जादा […]

पहाटेच्या प्रवासात भीषण दुर्घटना; दोन तरुण ठार, तिघांवर उपचार सुरू

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील विरवाडा येथून चोपडा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या चारचाकी वाहनाला अपघात होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास आडगाव–चोपडा दरम्यान घडली. या अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये राहुल अमृत भोई (वय ३१) व मयूर अरुण राजपूत (वय १९, दोघे रा. […]

प्राचार्यांची विद्यार्थ्याला जबर मारहाण : विद्यार्थ्याने घेतला टोकाचा निर्णय : मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद !

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून नजीक असलेल्या गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने रविवारी सायंकाळी नेहरूनगरातील रूमवर गळफास घेऊन आत्महत्या केली. श्याम प्रभाकर पाटील (१९, रा. बोदवड) असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या खिशात झालेल्या प्रकाराची सुसाइड नोट मिळून आली. त्यातून प्राचार्यांच्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी प्राचार्य योगेश पवार […]

जळगावातील मामा-भाच्याचे अपहरण करून २० लाखांची खंडणी, अकोल्यातून आरोपी ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी राजस्थान येथून पार्सल आल्याचे सांगून मामा-भाच्यांना चाकूचा धाक दाखवत अकोला येथे नेऊन डांबून ठेवत २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार १५ फेब्रुवारी रात्री घडला. यातील अपहरणकर्त्यांना शनिपेठ पोलिस व एलसीबीच्या पथकाने पहाटेच अकोला येथून ताब्यात घेतले. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल साहित्य विक्रीचे दुकान […]

तुम्हाला परदेशात जाण्याचा योग आहे. त्याशिवाय धार्मिक स्थळी जाण्याचाही योग आहे.

आजचे राशिभविष्य दि.१७ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज एखाद्या प्रकल्पातून तुम्हाला सरकारी लाभ होईल. ऑफिसमधील महत्त्वाच्या कामाबाबत वरिष्ठांशी चर्चा होईल. तसेच ऑफिसच्या कामानिमित्ताने बाहेर जाण्याचा योग आहे. तुमचा कार्यभार वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी महत्त्व प्राप्त होईल. कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद घडेल. घरातील सजावटीकडे जातीने लक्ष द्याल. शिवशंकराची तुमच्यावर अखंड कृपा राहील. जीवनसाथीसोबतचे मतभेद दूर होतील. प्रेम […]

error: Content is protected !!