कात्रजमध्ये थरारक अपघात : भरधाव डंपरची ५ वाहनांना धडक; बोगद्याजवळ पेट घेऊन जळून खाक !
पुणे : वृत्तसंस्था पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज येथील जांभुळवाडी बोगदाजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील डंपरने समोरील चार ते पाच वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धडकेनंतर काही क्षणांतच डंपरने अचानक पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अनियंत्रित डंपरने…