मुंबई : प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता प्रसाद ओक यांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या अभिनयाने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या मराठी चित्रपट ‘धर्मवीर’ साठी मिळवलेल्या १५ पुरस्कारांच्या माध्यमातून एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटासाठी सर्वाधिक पुरस्कार मिळवणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत त्यांचे नाव इंग्लंडस्थित Global Book of Excellence संस्थेने अधिकृतपणे नोंदवले आहे. हा विक्रम १४ जानेवारी २०२६ रोजी अधिकृतपणे मान्य व जाहीर करण्यात आला.

‘धर्मवीर’मध्ये प्रसाद ओक यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. जनतेसाठी आयुष्य अर्पण करणारे, लोकांमध्ये दैवतासमान स्थान असलेले व्यक्तिमत्त्व पडद्यावर उभे करण्याचे मोठे आव्हान त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडले. त्यांच्या अभिनयामुळे आनंद दिघे यांचे व्यक्तिमत्त्व, चालण्याची ढब, बोलण्याची शैली आणि जनसंपर्काची ताकद प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर आली.
या भूमिकेसाठी त्यांना १५ प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. एका मराठी चित्रपटासाठी एखाद्या अभिनेत्याने मिळवलेली ही सर्वाधिक पुरस्कारांची संख्या असल्यामुळे हा विक्रम मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षक एकमताने कौतुक करत आहेत.
प्रसाद ओक यांनी या जागतिक मान्यतेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. लेखक, दिग्दर्शक, माझं कुटुंब, प्रेक्षक आणि मला पुरस्कार देणाऱ्या सर्व परीक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. शीर्षक भूमिका साकारण्याची संधी मिळेल असे स्वप्नातही मला वाटले नव्हते. ‘धर्मवीर’ हा माझा ९६ वा चित्रपट होता. हजारो लोक ज्यांना दैवत मानतात अशा व्यक्तीची भूमिका साकारणे मोठी जबाबदारी होती आणि ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी केला,” असे ते म्हणाले.
आनंद दिघे यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी नसली तरी त्यांनी छायाचित्रे, निकटवर्तीयांशी संवाद आणि विविध आठवणींचा अभ्यास करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास केला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद, समीक्षकांची प्रशंसा आणि अभिनंदनाचे असंख्य दूरध्वनी हे सर्व अनुभव अविस्मरणीय ठरले, असे त्यांनी नमूद केले.
प्रसाद ओक यांना याआधी India Book of Records कडूनही मान्यता मिळाली होती. ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या दोन्ही मान्यतांना त्यांनी राष्ट्रीय पुरस्काराइतकेच महत्त्व दिले. “हा सन्मान केवळ माझ्यासाठी नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठीही आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन स्थान निर्माण करतो,” असे त्यांनी सांगितले.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



