१० वीची बोर्ड परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न असतो — आता पुढे काय? सर्वच विद्यार्थ्यांना दीर्घकालीन पदवी अभ्यासक्रम किंवा महागड्या कॉलेजचा खर्च परवडतोच असे नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांच्या करिअरचे दरवाजे बंद होतात. आजच्या स्पर्धात्मक आणि कौशल्याधारित युगात १० वी नंतरही अनेक टेक्निकल आणि प्रोफेशनल कोर्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे कमी कालावधीत नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात.चला तर पाहूया, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणते कोर्स भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
टेक्निकल कामात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयटीआय (Industrial Training Institute) हा उत्तम पर्याय मानला जातो. हा कोर्स साधारणपणे १ ते २ वर्षांचा असतो.यामध्ये इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, प्लंबर, मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर यांसारखे विविध ट्रेड उपलब्ध असतात. आयटीआय पूर्ण केल्यानंतर रेल्वे, कारखाने, खासगी कंपन्या तसेच सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी मिळतात.सुरुवातीला साधारण १५,००० ते ३०,००० रुपये मासिक वेतन मिळू शकते. अनुभव आणि कौशल्य वाढल्यास पगारातही वाढ होते.

ज्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रात लवकर प्रवेश करायचा आहे, त्यांच्यासाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा हा तीन वर्षांचा कोर्स उत्तम पर्याय आहे.यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अशा शाखांचा समावेश असतो. पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर कन्स्ट्रक्शन कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळू शकते.याशिवाय लेटरल एंट्रीच्या माध्यमातून बीटेकच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश घेऊन पुढील शिक्षणही पूर्ण करता येते.
आजच्या डिजिटल युगात डिजिटल मार्केटिंग हे झपाट्याने वाढणारे करिअर क्षेत्र बनले आहे. ३ ते १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणाऱ्या या कोर्समध्ये SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, ऑनलाइन जाहिरात, कंटेंट प्रमोशन यांसारखी कौशल्ये शिकवली जातात.या क्षेत्रात नोकरीसोबतच फ्रीलान्सिंग किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचीही संधी मिळते. सुरुवातीला २०,००० ते ४०,००० रुपये मासिक उत्पन्न मिळू शकते.
आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर वाढत असल्याने हार्डवेअर आणि नेटवर्किंग तज्ज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. हा कोर्स साधारण ६ महिने ते १ वर्षाचा असतो.कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्व्हिस सेंटर, खासगी कंपन्या किंवा स्वतःचा रिपेअरिंग व्यवसाय सुरू करता येतो. सुरुवातीला १५,००० ते ३०,००० रुपये मासिक कमाई होऊ शकते.
आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पॅरामेडिकल कोर्स उत्तम पर्याय आहे.यामध्ये लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन यांसारखे कोर्स समाविष्ट आहेत. हे कोर्स १ ते २ वर्षांत पूर्ण होतात. हॉस्पिटल, क्लिनिक आणि लॅबमध्ये या व्यावसायिकांची सतत मागणी असते. या क्षेत्रात सुरुवातीला १५,००० ते २५,००० रुपये मासिक वेतन मिळू शकते.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



