त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरण चर्चेत; भाविकाचा नशेत हल्ला, सुरक्षा रक्षकांनी बचावासाठी कारवाई
नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमधील जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकावर सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाविकांमध्ये संताप आणि चर्चा पसरली. व्हिडिओमध्ये दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षक लाथाबुक्क्यांनी मारताना, तसेच त्याचे कपडे फाटलेले दिसत आहेत. उपस्थित इतर भाविकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये टिपला, ज्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर टीका…