जळगाव पोलिसांचा दणका! कर्कश आवाजाच्या २६ बुलेटचे मॉडिफाइड सायलेन्सर रोड रोलरखाली
जळगाव : शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींविरोधात जळगाव पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करत पोलिसांनी २६ मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करून रोड रोलरखाली नष्ट केले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विशेष कारवाई करण्यात आली. कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींमुळे…