टाकरखेड्यात हृदयद्रावक घटना; दोन मुलांसह पती-पत्नीचा रेल्वेखाली दुर्दैवी अंत
अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्यासोबत असलेले दोन मुले सनी आणि राज यांना सोबत…