नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवात शरद पवारांचा गौरव; म्हणाले, “जनतेशी बांधिलकी ठेवणारा नेता”
मुक्ताईनगर : एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मुक्ताईनगर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खडसे यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव केला. “नाथाभाऊंनी जनतेशी बांधिलकी ठेवली; महाराष्ट्राला लोकांसाठी झटणारा नेता दिला,” असे गौरवोद्गार पवार यांनी काढले. शरद पवार म्हणाले की, एकनाथराव खडसे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्र, जळगाव…