जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड!

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्या लाच प्रकरणात मोठी मालमत्ता उघडकीस आली आहे. १० हजार रुपयांच्या लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या शिसोदे यांच्या घराची आणि जळगाव जनता सहकारी बँकेतील लॉकरची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली. या तपासणीत तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये किमतीची मालमत्ता […]