Home » राज्य » ६० वर्षीय मॅनेजरने केले २८ वर्षीय शिक्षिकेची पळून जावून लग्न : फोटो झाले व्हायरल !

६० वर्षीय मॅनेजरने केले २८ वर्षीय शिक्षिकेची पळून जावून लग्न : फोटो झाले व्हायरल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातील औराई भागातून आगळीवेगळी लव्हस्टोरी समोर आली आहे. ६० वर्षीय शाळा मॅनेजर राकेश शाह आणि २८ वर्षीय शिक्षिका शाइस्ता परवीन यांनी वय, धर्म आणि समाजाचे बंधन मोडत नेपाळमध्ये पळून जाऊन लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश शाह हे औराई भागातील एक खासगी शाळा चालवतात आणि शाइस्ता त्या शाळेत शिक्षिका आहेत. कामाच्या ठिकाणी दोघांमध्ये प्रेम वाढले आणि १८ फेब्रुवारीनंतर दोघे अचानक बेपत्ता झाले. त्यांनी नेपाळमधील एका मंदिरात गुपचूप लग्न केले. सोशल मीडियावर व्हायरल फोटोमध्ये दोघे वरमाला घालताना दिसत आहेत. शाइस्ताने म्हटले आहे, “मी माझ्या मर्जीने लग्न केले आहे. मी माझ्या निर्णयाबाबत समाधानी आहे. राकेशच्या कुटुंबीयांना कोणीही त्रास देऊ नये. मला अपहरण केलेले नाही.”

तरीही शाइस्ताच्या कुटुंबीयांनी राकेश शाह यांच्यावर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शाइस्ताचा भाऊ म्हणाला, “राकेश शाह यांनी माझ्या बहिणीचे बळजबरीने लग्न केले आणि धर्मांतरासाठी अपहरण केले आहे.” या तक्रारीत राकेश शाह आणि त्यांच्या पत्नीसह सात जणांचा उल्लेख आहे. दोघे वेगवेगळ्या धर्माचे असल्याने लग्नानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेचे मॅनेजर आणि शाळेला तात्पुरती टाळेबंदी लावण्यात आली आहे. औराई पोलीस स्टेशनचे प्रभारी राजा सिंह यांनी सांगितले की, प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे, व्हायरल व्हिडिओची चौकशी केली जात आहे आणि गावात नाकाबंदी ठेवण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरण ताब्यात घेतले असून, सर्व संबंधितांची चौकशी केली जात आहे. या लव्हस्टोरीमुळे सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या चर्चेचा विषय निर्माण झाला असून, प्रादेशिक पातळीवर तणाव कायम आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *