November 4, 2026 10:13 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » राष्ट्रीय » पुन्हा तब्येत बिघडली; शरद पवारांवर पुण्यात उपचार सुरू

पुन्हा तब्येत बिघडली; शरद पवारांवर पुण्यात उपचार सुरू

पुणे : वृत्तसंस्था 

माजी उपमुख्यमंत्री शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडल्याने त्यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबासह संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला असून या कठीण काळात शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी घटल्यामुळे प्रचंड अशक्तपणा जाणवला.

प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांना सौम्य डिहायड्रेशनमुळे आज रुग्णालयात दाखल केले गेले असून डॉक्टरांनी त्यांना द्रवपदार्थांची आवश्यकता असल्यामुळे सलाईन सुरू केली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवत आहे. रुग्णालय प्रशासनानुसार, ते २ दिवस उपचारांत राहतील आणि त्यानंतर घरी परतण्याची त्यांची अपेक्षा आहे.

शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, “बाळासाहेबांना पुन्हा डिहायड्रेशनचे त्रास जाणवत होता आणि काही अतिरिक्त तपासण्या शिल्लक असल्यामुळे आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार.”

काही दिवसांपूर्वीच शरद पवार रुबी हॉल रुग्णालयात पाच दिवसांपर्यंत उपचार घेत होते. तेव्हा छातीमध्ये संसर्ग आणि खोकला- कफचा त्रास जाणवत होता. या वेळी केलेल्या विविध वैद्यकीय तपासण्यांत ऑक्सिजनची पातळी आणि अन्य जीवनावश्यक निकष सामान्य मर्यादेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. प्रकृती सुधारल्यामुळे ते पाच दिवसानंतर घरी परतले होते आणि पुण्यातील निवासस्थानी विश्रांती घेत होते. मात्र आज पुन्हा अनुभवलेल्या अशक्तपणामुळे खबरदारीनं त्यांना पुन: रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!