November 4, 2026 8:10 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » महाराष्ट्र » शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट: पंतप्रधान किसान योजनेच्या हप्त्याची तयारी सुरू

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट: पंतप्रधान किसान योजनेच्या हप्त्याची तयारी सुरू

नई दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) अंतर्गत 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत मिळणार आहे, मात्र काही लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. योजनेत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळते. वर्षभरात एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. ही योजना 2018 मध्ये सुरू झाली असून आतापर्यंत 21 हप्ते वितरित केले गेले आहेत. 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला होता.

सरकारने यावेळी पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांनाच फायदा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्तपासणी सुरू केली आहे. या प्रक्रियेत खालील निकष तपासले जात आहेत:

  1. जमीन नोंदींची पडताळणी: 1 फेब्रुवारी 2019 नंतर नावावर जमीन नोंदलेल्या प्रकरणांची तपासणी केली जाते. जर जमीन नोंदीत विसंगती आढळली, तर लाभार्थ्याचे नाव यादीतून काढले जाऊ शकते.

  2. एका कुटुंबातून एकच लाभार्थी: पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले यांना एक कुटुंब मानले जाते. जर एका कुटुंबातील दोन जण लाभ घेत असल्याचे आढळले, तर त्यातील एकाचा लाभ थांबवला जातो.

यामुळे काही शेतकऱ्यांची नावे हप्त्यापूर्वी यादीतून वगळली गेली आहेत.

लाभार्थी पात्रता कशी तपासावी?

शेतकरी आपल्या नावाची स्थिती तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊ शकतात.

  • होमपेजवरील ‘Know Your Status’ पर्यायावर क्लिक करावा.

  • नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून माहिती पाहता येते.

  • याशिवाय, माहिती अपडेट करण्यासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध आहे.

हप्त्याची संभाव्य तारीख

केंद्र सरकारकडून अद्याप 22 व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. तथापि, अंदाजानुसार हप्ता या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सरकारच्या पुनर्तपासणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंदणी, ई-केवायसी आणि पात्रतेची स्थिती आधीच तपासून घ्यावी, म्हणजे हप्त्याचा लाभ वेळेत मिळू शकेल.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!