October 9, 2026 4:42 am

Home » जळगाव » लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार

लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार

जळगाव (प्रतिनिधी) : लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन काशिनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार जिल्ह्यातील कामगारांच्या विविध समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी तसेच वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र महाजन यांच्या हस्ते अर्जुन पवार यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संघटनेचे खजिनदार प्रविण महाजन उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर काम करण्यात येणार असल्याचे अर्जुन पवार यांनी यावेळी सांगितले. कामगारांच्या विविध समस्या शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. तसेच वंचित व गरजू कामगारांना त्यांच्या हक्कांचा न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सक्रियपणे कार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अर्जुन पवार यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे संघटनात्मक कार्य अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आगामी काळात जिल्ह्यातील विविध भागांत संघटनेचे जाळे मजबूत करून कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!