October 10, 2026 4:29 am

Home » जळगाव » ‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव आणि वामिका गब्बी जळगावकर रसिकांच्या भेटीला!

‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव आणि वामिका गब्बी जळगावकर रसिकांच्या भेटीला!

जळगाव, दि. ९ ऑक्टोबर : राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि खासदार उज्ज्वल निकम हे रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव शहरात उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने जळगावकर रसिकांना बॉलिवूड कलाकारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून छत्रपती संभाजी नाट्यगृहापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीतून मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार असून, कार्यक्रमाबाबत जळगावकरांमध्ये उत्सुकता आहे.

 

‘प्रहार’ चित्रपटाची उत्सुकता

 

‘प्रहार’ या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खासदार उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासातील विविध पैलू, त्यांचे कार्य आणि न्यायव्यवस्थेतील योगदान यावर आधारित या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. चित्रपटाच्या निमित्ताने प्रमुख कलाकारांसह खासदार उज्ज्वल निकम यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

 

या कार्यक्रमादरम्यान जळगावकर रसिकांना राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन

 

या कार्यक्रमाचे आयोजन ‘खासदार उज्ज्वल निकम कार्यक्रम मित्र परिवार समिती’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे समितीचे अध्यक्ष आहेत.

 

समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये नंदकुमार बेंडाळे, भरत अमळकर, अनिश शहा, अनिल कांकरिया, युसुफ मकरा, डॉ. रेखा महाजन, डॉ. राजेश पाटील, किरण बच्छाव, प्रकाश पाटील, अमर कुकरेजा, अॅड. भरत देशमुख, रोहित निकम, जितेंद्र लाठी, प्रसाद सूर्यवंशी, राहुल पवार, प्रतीक्षा सोनवणे, विराज कावडिया आणि हर्षल पाटील यांचा समावेश आहे.

 

जळगावकरांसाठी हा विशेष कार्यक्रम खुला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.

‘प्रहार’ चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार राव, वामिका गब्बी आणि खासदार उज्ज्वल निकम यांच्या जळगाव भेटीकडे आता रसिकांचे लक्ष लागले आहे.

 

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!