Home » जळगाव » जळगावात २६ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगावात २६ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मेहरुण परिसरातील गौतम नगरात राहणारा नबाब सादीक सैय्यद (वय २६) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दि. ९ रोजी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असेकी, शहरातील मेहरुण परिसरातील गौतम नगरात नबाब सादीक सैय्यद हा तरुण वास्तव्यास आहे. दि.९ रोजी सकाळच्या सुमारास नबाब सैय्यद याने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याचे नातेवाईक इब्राहीम शकील खाटील यांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत नबाब सादीक सैय्यद याला मयत घोषीत केले. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक सचिन पाटील हे करीत आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *