Home » जळगाव » पैसे न दिल्याने ३५ वर्षीय महिलेचा केला विनयभंग !

पैसे न दिल्याने ३५ वर्षीय महिलेचा केला विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील पारोळा शहरातील आर्थिक व्यवहारातील एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ३५ वर्षीय महिला घरात आपल्या मुलीसह एकटी होती. या वेळी तुषार देविदास नरवाळे याच्याशी असलेल्या मागील आर्थिक व्यवहार संपूर्णतः मिटलेला असताना बळजबरीने त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यास पैशां बाबत स्पष्ट शब्दात नकार दिला असता त्याने बळाचा वापर करत महिलेला विनयभंग केला. या प्रकरणी पारोळा पोलिसांत विनयभंग व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *