मुक्ताईनगर : प्रतिनिधी
रस्ता ओलांडणाऱ्या प्रौढाला दुचाकीने धडक दिली. यात तो ठार झाला. बऱ्हाणपूर-मुक्ताईनगर रोडवरील खामखेडा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजता ही घटना घडली. राजू रामभाऊ वाघ (वय ५०, रा. खामखेडा) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, राजू वाघ हे रात्री खामखेडा येथीलबसस्टॉपजवळ रस्ता ओलांडत होते. यावेळी दुचाकीस्वार बाळू बुधा भोई (वय २८, रा. मेळसांगवे) याने त्यांना जोरदार धडक दिली. यात वाघ यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना मुक्ताईनगर येथील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.याप्रकरणी राजू यांचा भाऊ अरुण रामभाऊ वाघ (रा. खामखेडा) यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पवन सपकाळ करीत आहेत



