Home » ताज्या » मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

पाचोरा : प्रतिनिधी

भडगावहून पाचोऱ्याकडे येताना मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर बांबरुड फाट्यानजीक घडली आहे. याबाबत पाचोरा पोलिसात अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, २१ रोजी रात्री १२:०० वाजेच्या सुमारास समाधान रामसिंग राजपूत (३०, पळाशी, ता. सोयगाव) हा इसम त्याच्या दुचाकीवरून (एमएच २० ईएस १९३७) भडगावहून पाचोरामार्गे पळाशी येथे जात असताना मध्यरात्री १२:०० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बांबरुड फाट्यानजीक अपघात होऊन त्यात समाधान जागीच ठार झाला.

याबाबत मध्यरात्री रस्त्यावरील ग्रामस्थांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. वडील व नातेवाइकांनी पाचोरा येथे येऊन खात्री केली असता अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. याबाबत मयताच्या वडिलांनी पाचोरा पोलिसात फिर्याद देऊन अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *