Home » जळगाव » गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर गुन्हा दाखल !

गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील भोकर येथे दि. २० जूनला विनापरवाना व अत्यंत निर्दयीपणे वाहनामध्ये गुरे कोंबून त्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर तालुका पोलिसांनी कारवाई करीत गुरांची सुटका केली. या वाहनातील एका अडीच वर्षीय वासराचा मृत्यू झाल्याचे आढळून आली आले. या प्रकरणी वाहनचालक व गुरे मालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील भोकर येथे एका ट्रकमधून (जीजे ०३, बीडब्ल्यू ८७५६) गुरे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. चालकाकडे गुरे वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. पाच गायी, सहा लहान वासरू यांना बांधून दाटीवाटीने वाहनात कोंबलेले होते. तसेच एक अडीच वर्षीय वासरू मतावस्थेत आढळले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालक रामजी रणछोड धोंडा (वय २३, रा. हाडाखेड, जि. धुळे) व गुरे मालक तेजस शरद म्हस्के (२६, रा. वाघनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *