Home » जळगाव » दुचाकीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध अखेर गुन्हा दाखल !

दुचाकीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध अखेर गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

सर्विस रोडने घराकडे येत असलेल्या योगेश बळीराम पाटील (वय ५१, रा. चैतन्य नगर) यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश पाटील यांचा मृत्यू झाला होता. धडक देणाऱ्या दुचाकीस्वार बेनी फर्नान्डीस रा. भुसावळ याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चैतन्य नगरात राहणारे योगेश पाटील हे दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी (एमएच १९, डीझेड ७७५६) क्रमांकाच्या दुचाकीने नशिराबाकडून जळगावकडे सर्विस रोडने येत होते. यावेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात असलेल्या (एमएच १९, ईडी ००६७) क्रमांकाच्या भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी योगेश पाटील यांच्यापत्नी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बेनी फर्नांडीस रा. भुसावळ यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *