Home » Uncategorized » किरकोळ वादातून पाळधीत दोन गटात हाणामारी

किरकोळ वादातून पाळधीत दोन गटात हाणामारी

धरणगाव  : प्रतिनिधी

तालुक्यातील पाळधीत शनिवारी सकाळी किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाल्याने एकच धावपळ उडाली होती. येथील मुख्य रस्त्यावर किरकोळ वाद झाला. हा वाद सुरू असताना तेथे जमाव जमला. यातच दोन गट आमनेसामने आल्याने त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत कोणी जखमी झाले नाही. मात्र यामुळे एकच धावपळ उडाली होती. तेथे पाळधीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पो. कॉ. रमेश सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली असून आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परवेज खान असलम खान, साहील खान असलम खान, जुबेद बिलाल कुरेशी (नंदूरबार), जावेद खान सुलतान खान, मास खान अमजद खान, फैजान खान अमजद खान, अजर अजगर कुरेशी, मुजफ्फर अजगर कुरेशी, मुश्ताक शेख मुख्तार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संदीप कंडारे करीत आहेत. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *