जळगाव : प्रतिनिधी
गौरींचे दर्शन घेऊन घरी जात असलेल्या उमा सतीश लाठी (५८, रा. नंदनवन कॉलनी) यांच्या गळ्यातील १५ – ग्रॅम वजनाची सोनपोत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना १ सप्टेंबर रोजी रात्री नंदनवन कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमा लाठी या त्यांची जाऊ, मुलीसह गौरींच्या (महालक्ष्मी) दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून परतल्यानंतर त्या गल्लीत महिलांसोबत उभ्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन दोन तरुण त्यांच्याजवळ आले. मागे बसलेल्या तरुणाने महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोनपोत ओढून नेली. या वेळी उमा लाठी यांनी आरडाओरड केली व काही जणांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे तेथून पसार झाले. दुचाकीवरुन आलेले चोरटे अंदाजे २० ते २५ वयोगटातील होते.



