बस आणि ट्रकची धडक : १६ प्रवासी गंभीर जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस आणि ट्रकची धडक झाली असून, बसच्या एका बाजूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात […]
भाजप दुतोंडी गांडूळच ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईत मनोज जरांगे-पाटील आल्यानंतर भाजप नेत्यांची भाषा बदलली. त्यांनी त्यांच्याविषयी अत्यंत हीन भाषा वापरली. मराठा समाजाविषयी द्वेष पसरवण्याचे काम भाजपचे नेते करत होते. मात्र मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचे कौतूक करतो. ते पडद्यामागे राहून सूत्र हलवत होते. कालच्या शिष्टाईचे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. मी त्यांचा टीकाकार असलो तरी कालच आंदोलनात […]
कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी १८ वर्षांनंतर कारागृहाबाहेर !

नागपूर : वृत्तसंस्था दगडी चाळीचा अनभिषिक्त सम्राट राहिलेला कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी अखेर १८ वर्षांनंतर कारागृहाबाहेर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर त्याची नुकतीच सुटका केल्याने नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून तो आज (दि. ३) बाहेर आला आहे. नागपूर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेले. माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता […]
मोठी बातमी : ओबीसी समाजासाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन !

मुंबई : वृत्तसंस्था मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. यानंतर आज (दि. ३) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी समाजासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसींच्या प्रश्नाबाबत एका उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (दि. ३) राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. ओबीसींच्या प्रश्नाबाबत […]
मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था मनोज जरांगे पाटलांचे आझाद मैदानावरील उपोषणाची यशस्वी सांगता झाल्यानंतर जरांगे पाटील मुंबईहून थेट संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पुढील दोन दिवस जरांगेंन उपचार घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णायक आंदोलनाचा निर्धार करीत २९ ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनामुळे मुंबईची […]
जळगावात गांजाची चोरटी विक्री उधळली ; पोलिसांकडून ९३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, जळगाव शहरातील मच्छीबाजार, तांबापुरा परिसरात एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात आहे. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत एक विशेष पथक तयार केले. पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अनिल वाघ, पोउपनि. राहुल तायडे, पो.उपनि. […]
दोघांनी केला तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी तू भाई झाला का, पोलीस स्टेशनला का आला होता असे म्हणत राजकिरण मानसिंग परदेशी (वय २६, रा. रायपूर, ता. जळगाव) याला दोघांनी रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार करीत जखमी केले. ही घटना दि. १ रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसीतील बालाजी इंडस्ट्रीजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे […]
भरधाव मालवाहू वाहनाची चार दुचाकींना धडक : एकाचा मृत्यू तीन जखमी !

जळगाव : प्रतिनिधी टाइल्स घेऊन जाणाऱ्या भरधाव मालवाहू वाहनाने चार दुचाकींना एकापाठोपाठ धडक दिल्याने या अपघातात स्वप्निल अशोक कापुरे (४०, रा. नवजीवन कॉलनी, वाघनगर) यांचा मृत्यू झाला. अन्य तिघेजण जखमी असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवारी (२ सप्टेंबर) रात्री रामानंदनगर घाटात घडली. सविस्तर वृत्त असे कि, नवजीवन कॉलनीतील स्वप्निल कापुरे हे एका […]
नंदनवन कॉलनीत महिलेच्या गळ्यातून सोनपोत लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी गौरींचे दर्शन घेऊन घरी जात असलेल्या उमा सतीश लाठी (५८, रा. नंदनवन कॉलनी) यांच्या गळ्यातील १५ – ग्रॅम वजनाची सोनपोत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना १ सप्टेंबर रोजी रात्री नंदनवन कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमा लाठी या त्यांची जाऊ, […]
विद्यार्थ्यांशी बोलता बोलताच शिक्षकाने घेतला अखेरचा श्वास !

यावल : प्रतिनिधी कधी काळी विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानदीप प्रज्वलित करणारे शिक्षक एम.डी. नारखेडे यांची जीवनयात्रा त्याच ज्ञानमंदिरात संपली, जिथे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. दहिगाव येथील आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. एम.डी. नारखेडे इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. ३३ वर्षात त्यांनी शेकडो […]