Home » जळगाव » चोपडा » खाऊ देण्याच्या बहाण्याने नराधमाने केला चिमुकलीवर अत्याचार !

खाऊ देण्याच्या बहाण्याने नराधमाने केला चिमुकलीवर अत्याचार !

चोपडा : प्रतिनिधी

खाऊ देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून पाच वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. ही घटना दि. १५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोरगावले रस्त्यावरील एका शेतातील झोपडीत घडली. यावेळी संतप्त जमावाकडून अत्याचार करणाऱ्या नराधमाची धुलाई केली. याप्रकरणी चोपडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील गोरगावले रोडवर असलेल्या झोपड्यांमध्ये मध्यप्रदेशातील परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहे. याच ठिकाणी राहत असलेल्या २५ वर्षीय मयाल (पुर्ण नाव माहित नाही) (मूळ रा. पिंपऱ्यापाणी ता. वरला, जि. बडवानी) याने शेजारी राहत असलेल्या पाच वर्षीच चिमुकलीचे आई वडील घरी नसल्यामुळे तीला खाऊ देण्याचे अमिष दाखवून घरात बोलाविले. त्यानंतर चिमुकलीवर त्याने अत्याचार केला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या नराधमापासून चिमुकलीची सुटका केली.

कामासाठी आलेले चिमुकलीच कुटुंब हे एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. या प्रकाराबाबत त्यांना कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली, त्यांनी पीडित मुलीला ताब्यात घेतले. तर संतप्त जमावाने अत्याचार करणाऱ्या नराधमाची धुलाई केली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत त्या नराधमाला संतप्त जमावाच्या तावडीतून सोडविले.  घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय जितेंद्र वल्टे, एकनाथ भिसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीडीत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक झाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *