विविध आस्थापनांना भेटी : मुख्य कार्यकारी अधिकारी करनवालांचा धडाका !

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा भरातील विविध आस्थापनांना भेटी देण्याचा धडाका सुरू केला असून बुधवार दि.१६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीना भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेल्या अस्वच्छता प्रकरणी तेथील सफाई कामगाराचे एका दिवसाचे वेतन रोखण्याचे […]
कच्च तेल स्वस्त पण दरवाढी मस्त..! केंद्र सरकारच्या महागाई धोरणाच्या विरोधात रस्ता रोको !

जळगाव : प्रतिनिधी दिनांक 16 एप्रिल रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे रस्ता रोको आकाशवाणी चौकात करण्यात आले सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर प्रति बॅरल 65.41 डॉलर आले आहेत यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये किमती प्रति बॅरल 63.40 डॉलर होती या कसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेले […]
डाळ साठवणूकीचे स्टोरेज अंगावर पडले : बापलेकाचा दुर्देवी मृत्यू !

यवतमाळ : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता यवतमाळ शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. डाळ साठवणूकीचे स्टोरेज अंगावर पडल्याने सुपरवायझरसह कामगार बापलेकांचा दुर्देवी मृत्यू झाला. यवतमाळ येथील लोहारा एमआयडीसी परिसरात असलेल्या मनोरमा जैन दालमील येथे मंगळवारी ( दि. 15) दुपारी घडली. भावेश कडवे ( रा. वर्धा) असे मृत सुपरवायझरचे नाव […]
देशात सोन्याच्या दराने गाठला पुन्हा उच्चांक !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता 16 एप्रिल 2025 रोजी देशभरातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सध्या वाढीचा कल अधिक आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर मंगळवारी 93,353 रुपयांवरून कमी होऊन 93,102 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, […]
नाशिकमध्ये मध्यरात्री राडा : पोलिसांवर झाली दगडफेक !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक येथील द्वारका परिसरातील काठे गल्लीमध्ये मंगळवारी दि.१५ रात्री उशिरा अनधिकृत दर्गा पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत जमावाने रात्री अचानक केलेल्या दगडफेकीत चार महापालिका अधिकारी आणि 21 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हिंसाचारात पोलीसांच्या पाच वाहनांचेही नुकसान झाले […]
अखेर ‘ते’दोन पोलीस हवालदार निलंबित !

जळगाव : प्रतिनिधी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी पोलिस हवालदार रवींद्र प्रभाकर सोनार (वय ४६) व पोलिस नाईक धनराज नारायण निकुंभ या दोघांना पोलीस ठाण्यातच वीस हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते. या दोघांना निलंबीत करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक हिंसाचाराच्या दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी रवींद्र सोनार व धनराज निकुंभ या दोघांनी तक्रारदारकडे ५० […]
तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी केली अटक

जळगाव : प्रतिनिधी हमालीच्या कामासाठी जात असतांना दोन तरुणांनी दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांना पैसे न दिल्याने हमाली कामाच्या हुकाने सूरज उर्फ विशाल अनिल सोनवणे (वय ३७, रा. जूने जळगाव) या तरुणाच्या डोळ्यावर वार करुन जखमी केले. ही घटना दि. १३ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास आंबेडकर नगराजवळील पुलावर घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुनहा दाखल […]
जंगलात आढळला महिलेचा संशयास्पद स्थितीत कुजलेला मृतदेह !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील गाड्या जामन्याच्या जंगलात ३० ते ४० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. या महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्यामुळे खळबळ माजून गेली आहे. तसेच महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात असून त्यादिशेने तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतावरील अतिदुर्गम भाग […]
भररस्त्यावर पाच जणांनी केला महिलेचा विनयभंग !

यावल : प्रतिनिधी रस्त्यावर उभ्या असलेल्या ५४ वर्षीय महिलेसोबत वाद घालीत तिला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच यावेळी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. ही घटना १४ रोजी यावलल शहरात घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेन रोड परिसरात ५४ वर्षीय […]
खाऊ देण्याच्या बहाण्याने नराधमाने केला चिमुकलीवर अत्याचार !

चोपडा : प्रतिनिधी खाऊ देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून पाच वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. ही घटना दि. १५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोरगावले रस्त्यावरील एका शेतातील झोपडीत घडली. यावेळी संतप्त जमावाकडून अत्याचार करणाऱ्या नराधमाची धुलाई केली. याप्रकरणी चोपडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील गोरगावले […]