Home » जळगाव » दुचाकीने आले अन महिलेचे सव्वा लाखांचे मंगळसूत्र लांबविले !

दुचाकीने आले अन महिलेचे सव्वा लाखांचे मंगळसूत्र लांबविले !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या मागील प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. दिवाळीच्या फराळानंतर घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे १२ ग्रॅम वजनाचे, सव्वा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने भरदिवसा हिसकावून नेले. ही घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, योगिता अनिलकुमार नारखेडे या जामनेर रोडवरील घाशीलाल वडेवाले यांच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी गेल्या होत्या. फराळ झाल्यानंतर त्या दोन पिशव्या हातात घेऊन ताप्ती पब्लिक स्कूलच्या मागील प्रवेशद्वाराजवळ आल्या. तेव्हाच सिंधी समाजाच्या स्मशानभूमीच्या दिशेने एक विना क्रमांकाची मोटरसायकल भरधाव वेगाने आली. मोटारसायकलवर असलेल्या तरुणाने चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. काही कळायच्या आत त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र झडप घालून हिसकावले आणि दुचाकीवरून पळ काढला.

योगिता नारखेडे यांनी आरडाओरड केली, मात्र सकाळची वेळ असल्याने परिसरात फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे चोरट्याला रोखता आले नाही. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू केला आहे.

पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील चोरटा लवकरच गजाआड होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *