जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली येथे घरी कोणी नसताना एकनाथ यशवंत चौधरी (वय ५२) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार दि. ७ मे रोजी दुपारी शेजारी राहणाऱ्या चौधरी यांच्या मावशीच्या लक्षात आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे एकनाथ चौधरी हे कुटुंबियांसह वास्ताव्यास होते. एका वाहनावर चालक म्हणून कुटुंबियांचा उदनिर्वाह करत होते. बुधवार दि. ७ मे रोजी दुपारी चौधरी यांनी घरी कोणीही नसतांना गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. शेजारी राहणाऱ्या मावशी त्यांच्या घरी गेल्या त्या वेळी त्यांना चौधरी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी लागलीच ही माहिती परिसरात राहणाऱ्यांना दिली. त्यावेळी चौधरी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



