September 30, 2026 4:44 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यात 6 आणि 7 जून रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सुमारे 7 हजार 235 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव व चोपडा तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी स्पष्ट केले की, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. या […]

चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा केला खून : घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच नागपूर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने प्रेयसीची डोक्याच्या मागील बाजूस रॉड मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा […]

पाकिस्तान आता साखळी बॉम्बस्फोटाने हादरले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ९ दहशतवादी तळ नष्ट केल्याची घटना घडल्यानंतर आता पाकिस्तान पूर्णतः हादरले आहे. पाकिस्तानातील आता कराचीमध्येही बॉम्बस्फोट झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सध्या भितीचे वातावरण पसरले आहे. याआधी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये नौदलाच्या मुख्यालयातही स्फोट झाला. लाहोर, रावळपिंडी आणि कराची विमानतळ यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तान यात भारताचा हात […]

भारताचा मोठा निर्णय : भारतीय हवाई दलाला दिली मोकळीक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मूमधील पहलगाम हल्ल्याचा बदल भारतीय सैन्याने ६-७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केला. या मोहिमे अंतगर्त पाकिस्तान आणि पीओकेवर भारतीय सैन्याने हल्ला करून ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यापासून पाकिस्तान नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार करत आहे. सीमेपलीकडून झालेल्या या भ्याड कृत्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाकच्या गोळीबाराला […]

ऑपरेशन सिंदूरनंतर अल कायदाची भारताला धमकी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ६ मे रोजी भारतीय हवाई दल आणि लष्कराने अभूतपूर्व लष्करी ऑपरेशन “ऑपरेशन सिंदूर” राबवले. याअंतर्गत, पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. यावेळी हल्ला फक्त हवाई दलाने केला नाही तर लष्कराच्या तोफखाना तुकड्यांनीही अत्याधुनिक शस्त्रे आणि स्मार्ट तंत्रज्ञानासह युद्धपातळीवर कारवाई केली. आता अल-कायदाच्या भारतीय उपखंड शाखेने (AQIS) एक निवेदन जारी केले आहे. […]

मुलगा पसंत नसल्याने नववधु फरार !

जळगाव : प्रतिनिधी कुटुंबियांनी ज्यासोबत लग्न ठरविले तो मुलगा पसंत नव्हता. त्यामुळे लग्नाला चार दिवसांचा कालावधी शिल्लक असतांनाच उपवर मुलगी कॉलनीतील तरुणासोबत पसार झाली. समाजात बदनामी होईल या भितीमुळे कुटुंबियांनी उपवर मुलीच्या लहान बहिणीसोबत तरुणाचे लग्न लावून दिल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या […]

माहेरी आलेल्या विवाहितेच्या गळ्याला लावला चाकू अन लांबविली रोकड !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर हुडको येथे माहेरी आलेली विवाहिता सपना शंकर वाघ (वय २७, रा. पारोळा) ही घरात झोपलेली असतांना, रात्रीच्या सुमारास त्या परिसरातील गजानन बाविस्कर हा त्यांच्या घरात शिरला. त्याने विवाहितेच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून विवाहितेकडील पैशांचे पाकीट घेवून पसार झाला. ही घटना दि. ७ पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर […]

शिरसोली एकाने गळफास घेवून आयुष्य संपविले !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली येथे घरी कोणी नसताना एकनाथ यशवंत चौधरी (वय ५२) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार दि. ७ मे रोजी दुपारी शेजारी राहणाऱ्या चौधरी यांच्या मावशीच्या लक्षात आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे एकनाथ चौधरी हे कुटुंबियांसह वास्ताव्यास होते. एका […]

घराशी संबंधित कोणतेही काम महाग पडू शकते

आजचे राशिभविष्य दि.८ मे २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज विरोधक नमते घेतील. तुम्ही तुमचं काम योग्य रीतीने पूर्ण करू शकाल. तरुणांना काही चांगले यश मिळेल. या काळात तुमच्या बजेटची काळजी घ्या. घराशी संबंधित कोणतेही काम महाग पडू शकते. कोणाबद्दलही नकारात्मक विचार ठेवू नका. भागीदारीसंबंधित व्यवसाय पूर्वीसारखाच चालू राहील. पती-पत्नीचे नाते गोड राहील. आरोग्य […]

error: Content is protected !!