जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका परप्रांतीय १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षापासून अत्याचार केला. या अत्याचारातून बाळास जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी गुरूवारी ३० जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवशी असलेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या पालकांसह जळगाव तालुक्यातील एका गावात गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्याला आहे. याच परिसरात राहणारा संशयित आरोपी चमासिंग बिलाला (वय २२) याने अल्पवयीन मुलीला गेल्या दोन वर्षांपासून तिच्या अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी ३० जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी चमासिंग बिलाला याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.



