Home » ताज्या » बेपत्ता बालक शेजारच्या घरात मृतावस्थेत आढळल्याने यावल शहरात खळबळ !

बेपत्ता बालक शेजारच्या घरात मृतावस्थेत आढळल्याने यावल शहरात खळबळ !

यावल : प्रतिनिधी

शहरातील बाबूजी पुरा भागातील रहिवासी असलेला सहा वर्षीय शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाल्याने शोध सुरू असताना या बालकाचा मृतदेह शनिवारी बालकाच्या घराशेजारील रहिवाशाच्या घरातील कोठीत जळालेल्या अवस्थेत सापडल्याने शहरात खळबळ उडाली. खुनाचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठ्या संख्येत संतप्त जमाव बाबुजीपुरा भागात दाखल झाला. दरम्यान, शहरातील वातावरण पाहता दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवासी मो.हन्नान खान मजीद खान (6) हा मजीद खान जनाब यांचा मुलगा शुक्रवार, 5 सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपासून बेपत्ता असल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही तर शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास या बालकाचा मृतदेह त्यांच्याच शेजारी राहणार्‍या बिस्मिल्ला खलीफा दस्तगीर खलीफा यांच्या दुमजली घरातील वरच्या मजल्यावर एका कोठीत मिळून आला.

घटनेची माहिती वार्‍यासारखी शहरात पसरली व घटनास्थळी प्रचंड जमाव एकत्र झाला जमावास शांत करण्याकरीता हाजी शब्बीर खान, डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरिीक्षक रंगनाथ धारबळे, शरद कोळी, सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख, अयाज खान तसेच मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रयत्न केले. फॉरेन्सिक पथक दाखल होत असून शहरात सध्या तणावाचे वातावरण असल्याने बाबुजी पुरा भागात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *