जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या एमईसीबीच्या विश्रामगृहात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिलेचा विनयभंग केला. याबाबतची तक्रार पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांकडून महिलेचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यानंतरपोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात नव्याने बदलून आलेले एमईसीबीचे वरिष्ठ अधिकारी महावितरणच्या एमआयडीसीतील विश्रामगृहात वास्तव्यास आहेत. याठिकाणी वास्तव्यास असलेल्या त्या अधिकाऱ्याने महिलेचा विनयभंग केला. याबाबतची तक्रार घेवुन पिडीत महिला एमआयडीसी पोलिस ठाण्यात घेवुन गुरुवारी सकाळी पोहचली. तिच्या तक्रारीवरून बराच वेळ पोलिस ठाण्यात अनेक कर्मचारी थांबून होते. एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्या तक्रारीची खातरजमा करण्याची प्रक्रिया सुरु होती. तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.


