Home » जळगाव » जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू तर धरणात बुडून बालिकेचा मृत्यू !

जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू तर धरणात बुडून बालिकेचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

शिरसोली येथील सज्जनशाह बाबा यांच्या दर्यावर घरातील लग्नकार्य आटोपल्यानंतर पाहुणे मंडळींसोबत कुटुंबिय गेले होते. त्या परिसरात काही मुली खेळत असतांना तीन जणांचा पाय घसरुन त्या नायगाव धरणाच्या पाण्यात बुडाल्या. नातेवाईकांनी पाण्यात उडी घेत दोन मुलींना वाचवले. मात्र खुशी अरमान पटेल (वय १४, रा. फातेमा नगर) हीचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. २४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत पाचोरा तालुक्यातील बांबरुड येथे सुटीवर आलेल्या जवानाचा विहिरीत पाय घसरुन मृत्यू झाल्याची घटना दि. २४ रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फातेमा नगरात अरमान पटेल हे वास्तव्यास असून दि. १८ रोजी त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. लग्नसोहळ्याकरीता पटेल कुटुंबियांकडे नातेवाईक आले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर घरी आलेल्या नातेवाईकांसोबत पटेल कुटुंबीय हे शिरसोलीजवह नायगाव धरणाजवळ असलेल्या सज्जनशाह बाबा यांच्या दर्यावर गेले होते. धरणाच्या परिसरात अरमान पटेल यांची लहान मुलगी खुशी ही आपल्या मैत्रीणींसह खेळत होती. याठिकाणी त्यांचे नातेवाईक देखील उपसिथत होते. धरणाजवळ खेळणाऱ्या तीन मुलींचा अचानक पाय घसरला आणि त्या धरणाच्या पाण्यात बुडू लागल्या.

धरणाच्या खोल पाण्यात तिघ मुली बुडत असतांना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी तेथे असलेल्या मुजाहीद पटेल या युवकाने धरणाच्या पाण्यात उडी घेत बुडत असलेल्या आयशा पटेल (वय १२), अलिझा पठाण (वय १३) या दोघांनी पाण्यातून बाहेर काढले. परंतू तो पर्यंत खुशी ही खोल पाण्यात बुडाल्याने तीचा दुर्देवी मृत्यू झाला. काही वेळानंतर बुडालेल्या खुशी पटेल हीला पाण्यातून बाहेर काढून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून खुशी हीला मयत घोषीत केले. यावेळी रुग्णालयात तिच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

अरमान पटेल यांच्या मुलीचे सहा दिवसांपुर्वीच विवाह सोहळ्याकरीता नातेवाईक आल्यामळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र गुरुवारी दुर्देवी काळाने त्यांच्या लहान मुलीवर झडप घातल्याने काही क्षणातच आनंदीत असलेल्या पटेल कुटुंबियांवर दुःखा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बांबरुड येथे जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू पाचोराः सुट्टीवर आलेल्या जवानाचा विहिरीत पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. २४ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सैनिक रवींद्र पंडितराव पाटील (वय ३८) असे मयत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. भडगाव येथून जवळच असलेल्या बांबरुड खुर्द ता. पाचोरा येथील रहिवासी व आसाम रायफल शिलॉग येथे नोकरीस होता. हा जवान दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शेतात फेरफटका मारायला गेला असता त्याचा विहिरीत पाय घसरून विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे चुलत भाऊ गोपाल पाटील हा सकाळी ११ वाजता शेतात गेला असता विहिरीजवळ चप्पल, रुमाल दिसल्याने रविंद्र पाटील हा विहिरीच्या पाण्यात पडला असावा असा संशय त्याला आला.  याबाबत घटनेची माहिती गावात पोहोचताच नातेवाईकांसह नागरिकांनी घटनेस्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पाचोरा येथील हुसेन शेख यांना बोलवण्यात आले. त्यांनी विहिरीच्या पाण्यातून रविद्र पाटील यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. जवानाला भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ पंकज जाधव यांनी तपामन मयत घोषित केले

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *