Home » जळगाव » शेतात काम करणाऱ्या महिलेचा एकाने केला विनयभंग !

शेतात काम करणाऱ्या महिलेचा एकाने केला विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील बोरनार शिवारातील एका शेतात बुधवार दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या दाम्पत्याला काहीही कारण नसतांना शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील बोरनार शिवारातील शेतात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दाम्पत्य हे शेतात काम करत होते. यावेळी संशयित प्रेम गोपीचंद धनगर (रा. बोरनार, ता. जळगाव) हा शेतात आला. त्याने काहीही कारण नसतांना दोघांना शिवीगाळ केली. तसेच महिलेचा हाता पकडून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची देखील धमकी दिली. याप्रकरणी महिलेने रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित प्रेम धनगर याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *