जळगावात खाजगी रुग्णालयाचा भोंगळ कारभार : २१ वर्षीय युवकाचा मृत्यू, पोलिसांना न कळवता मृतदेह थेट सरकारी रुग्णालयात !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका खाजगी रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मंगळवारी उपचारादरम्यान 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, या गंभीर घटनेची कायदेशीर प्रक्रिया न पाळता रुग्णालय प्रशासनाने थेट मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून शासकीय रुग्णालयात पाठवून दिल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवकाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित खाजगी रुग्णालयाने पोलिसांना […]
मालेगाव बंद दरम्यान संतप्त मोर्चा बेकाबू; न्यायालयावर धडक, पोलिसांसोबत झटापट

नाशिक : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव 3 वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे होरपळून निघाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देऊन मोर्चा काढला होता. पण मोर्चेकऱ्यांनी थेट स्थानिक न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे हे […]
लाडकी बहीण योजनेचा दुरुपयोग थांबवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरप्रकार करणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झालेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, आर्थिक लाभाची वसुली आणि वेतनवाढ रोखण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा शुभारंभ […]
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महसूल कर्मचारीचा अपघातात मृत्यू !

धरणगांव : प्रतिनिधी धरणगाव तहसील कार्यालयातील लिपिक व एरंडोल येथे राहणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांला भरधाव वेगाने मागाहून येणाऱ्या डंपरने जबर धडक दिल्याने दि. २० रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे एरंडोलसह धरणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील अष्टविनायक कॉलनीतील शिवाजी रघूनाथ महाजन (वय ४२) […]
शेतात काम करणाऱ्या महिलेचा एकाने केला विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोरनार शिवारातील एका शेतात बुधवार दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या दाम्पत्याला काहीही कारण नसतांना शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील बोरनार शिवारातील शेतात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दाम्पत्य हे […]
भरधाव पिकअपच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील ५३ वर्षीय प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज त्र्यंबक शिरसाळे (वय ५३, रा. गाडेगाव, ता. जामनेर) असे मयत प्रौढाचे नाव आहे. ते पत्नी आणि तीन मुलांसह गाडेगाव येथे […]
दीपनगरात खळबळ : अधीक्षक अभियंत्याने घेतली लाच !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून लाचलुचपतच्या घटना घडत असताना आता भुसावळ येथील दीपनगर महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता भानुदास पुंडलिक लांडवंजारी (वय ५७, रा. नेहरुनगर, जळगाव) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदाराचे मोठे विद्युत बिल दुरुस्त करून वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी लांडवंजारी यांनी […]
आज तुमची आवड आध्यात्मिक ज्ञानात असेल. व्यवसाय आणि कुटुंबात संतुलन राखले जाईल.

आजचे राशिभविष्य दि.२१ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, यामुळे तुमचे काम सोपे होईल. तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून काही सल्ला मिळेल. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटून आनंदी व्हाल. वृषभ राशी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा विचार कराल. आज तुमची आवड आध्यात्मिक ज्ञानात असेल. व्यवसाय आणि कुटुंबात संतुलन राखले जाईल. […]