यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका ३७ वर्षीय तरुणाने शुक्रवारी आपल्या राहत्या घरात विषरी द्रव्य प्राषण केले. हा प्रकार निर्दशानास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मयत घोषीत केले. थोरगव्हाण येथील रहिवासी प्रवीण राजेंद्र सपकाळे (वय ३७) हा तरूण आपल्या घरी होता.
राहत्या घरात त्याने कोणते तरी विषारी द्रव्य प्राषण केले. दरम्यान, त्याची पत्नी माहेराहून त्याच्या सोबत आली नाही म्हणून तो निराश होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यानंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, डॉ. हर्ष पटेल, दीपाली किरंगे, सुमन राऊत, अमोल अडकमोल आदींनी तत्काळ उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
