November 13, 2026 8:29 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » किरकोळ कारणावरून वाद : २१ वर्षीय जखमी तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू !

किरकोळ कारणावरून वाद : २१ वर्षीय जखमी तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा परिसरात १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या एका किरकोळ वादाने अत्यंत गंभीर वळण घेतले असून, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुभम गजानन सपकाळे असे मृत तरुणाचे नाव असून, मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास शुभम सपकाळे हा प्रशांत पाटील चौक परिसरातून सार्वजनिक रस्त्याने जात असताना काही युवकांनी त्याला अडवले. कोणतेही ठोस कारण नसताना विशाल भिका सोनवणे, चंद्रकांत उर्फ बाळा कोळी, यश प्रदीप पाटील (बॉण्ड) आणि धीरज कोळी यांनी संगनमत करून शुभमवर लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती.
घटनेनंतर जखमी अवस्थेत शुभमला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता शुभमच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात कलम १०३ (खून) वाढवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शुभमच्या मृत्यूची बातमी समजताच पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंप्राळा परिसरात तसेच शुभमच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  शुभमचा मृतदेह उद्या, शुक्रवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान जळगावात आणण्यात येणार असून, त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके कार्यरत आहेत.  या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी करत असून, एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने शहरात गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!