धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथील कापड दुकानात कामाला असलेल्या विवाहितेवर त्याठिकाणी काम करणाऱ्या तरुणाने अत्याचार केला. ही घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी विजय गोपाल भोई (वय २२, रा. पाळधी, ता. धरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गावात असलेल्या एका कापड दुकानात विवाहित महिला कामाला होती, त्याच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणासोबत तीचे प्रेम जुळले. मी तुझा दोन्ही मुलांचा सांभाळ करेल असे सांगून त्या तरुणाने २०२१ पासून वेळोवेळी दुकानासह विवाहितेच्या घरी तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार महिलेच्या पतीला माहिती पडल्यानंतर त्याने पीडितेला सोडून दिले. अखेर पीडितेने पाळधी पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित विजय भोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास पाळधी पोलीस चौकीचे स. पो. नि. प्रशांत कंडारे तपास करीत आहेत.


