Home » जळगाव » भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार !

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार !

जळगाव : प्रतिनिधी

आजीचे निधन झाल्यामुळे मावशीकडे आलेला प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (१८, रा. लोंढरी, ता. जामनेर) हा दुचाकीने जात असताना वाहनाने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) सुप्रिम कॉलनीजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा उत्तीर्ण होवून महाविद्यालयीन शिक्षणासाठी जयपाल पाटील हा सध्या छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या आजीचे निधन झाल्यामुळे तो आई-वडील आणि बहिणीसह सुप्रिम कॉलनीमध्ये मावशीच्या घरी आला होता. मंगळवारी तो दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी जात असताना सुप्रीम कॉलनीजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना दुपारी त्याचा मृत्यू झाला. आई-वडिलांना जयपाल हा एकुलता एक मुलगा होता.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *